अर्थ मंत्रालयाची मोठी शिफारस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
12 सरकारी बँकांमधील भरती संदर्भात प्रारंभिक आणि मुख्य दोन्ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसह 13 प्रादेशिक भाषांमध्य आयोजित केल्या जाव्यात, अशी शिफारस केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केली आहे.
सरकारी क्षेत्रातील बँकांमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये लिपिक शेणीसाठी परीक्षा आयोजित करण्याप्रकरणी विचार करण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून स्थापन एका समितीने ही शिफारस केली आहे. इन्स्टीटय़ूठ ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनकडून सुरू करण्यात आलेल्या परीक्षा आयोजित करण्याची विद्यमान प्रक्रिया समितीच्या शिफारसी उपलब्ध होईपर्यंत रोखून ठेवण्यात आल्या होत्या. समितीने हा निर्णय स्थानिक तरुणाईला रोजगाराची एक समान संधी प्रदान करणे आणि स्थानिक/प्रादेशिक भाषेच्या माध्यमातून ग्राहकांसोबत अधिकाधिक जुळण्याच्या उद्देशाने घेतला आहे. यामुळे ग्राहक आणि बँक यांच्यात कम्युनिकेशन गॅपची शक्यता कमी होणार आहे.