कोलकाता
सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत यजमान बंगालने आपला सलग दुसरा विजय नोंदविला. मंगळवारी येथे झालेल्या सामन्यात यजमान बंगालने झारखंडचा 16 धावांनी पराभव केला. बंगाल संघातील सलामीचा फलंदाज विवेक सिंगने 64 चेंडूत शतक झळकविले. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात हैदराबादने ओडिशाचा 6 धावांनी पराभव केला.
यजमान बंगालने गेल्या रविवारी या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ओडिशाचा पराभव केला होता. मंगळवारी दुसऱया सामन्यात बंगालने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 161 धावा जमविल्या त्यानंतर झारखंडने 20 षटकांत 9 बाद 145 धावापर्यंत मजल मारली. बंगालच्या डावात सलामीच्या विवेक सिंगने 64 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारांसह 100 धावा झळकविल्या. त्याने गोस्वामीसमवेत पहिल्या गडय़ासाठी 60 धावांची भागीदारी केली. गोस्वामीने 28 चेंडूत 3 चौकारांसह 27 धावा जमविल्या. झारखंडतर्फे मोनुकुमारने 30 धावांत 3 गडी बाद केले. झारखंडच्या डावात विराट सिंगने 47 तर उत्कर्ष सिंगने 28 धावा जमविल्या. या सामन्यात बंगालला चार गुण मिळाले. दुसऱया एका सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 8 बाद 153 धावा जमविल्या. तिलक वर्माने 44, अगरवालने 34 धावा केल्या. ओडिशातर्फे सुर्यकांत प्रधानने 34 धावांत 3 बळी मिळविले. त्यानंतर ओडिशाने 20 षटकांत 4 बाद 147 धावा जमविल्या. गोविंदा पोद्दारने 50, सेनापतीने नाबाद 42, धुपारने नाबाद 30 धावा जमविल्या. हैदराबादतर्फे मिंलीदने 24 धावांत 2 बळी मिळविले. हैदराबादने या सामन्यात 4 गुण घेतले.