ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पश्चिम बंगालमध्ये सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान नवे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सुशील चंद्रा आणि राजीव कुमार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर काही उपनिवडणूक आयुक्तांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉलद्वारे संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असतात. जेणेकरून पश्चिम बंगाल निवडणुकांचे उर्वरित तीन टप्पे विनाअडथळा पार पडतील.