ऑनलाईन टीम / कोलकाता :
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि मोयना विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अशोक दिंडा यांना वाय प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या बरोबर आता कायम सीआरपीएफचे जवान असणार आहेत.
दरम्यान, गुरुवारी दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यापूर्वी केवळ एक दिवस आधी दिंडा यांना सुरक्षा दिली जात आहे. गुरुवारी बंगालमध्ये 4 जिल्ह्यातील 30 जागांसाठी मतदान होणार आहे.
दरम्यान, अशोक दिंडा यांच्यावर मंगळवारी एका निवडणूक प्रचारसभेत भाग घेतला असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी दिंडा यांच्या गाडीवर पन्नासहून जास्त लोकांनी हल्ला केला. त्यामध्ये त्यांच्या गाडीचे प्रचंड नुकसान करण्यात आले. तसेच भाजप उमेदवार अशोक दिंडा यांच्या खांद्याला आणि पाठीलाही जबर मार लागला आहे. आपल्यावर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनीच हल्ला केल्याचा आरोप अशोक दिंडा यांनी केला आहे.