वृत्तसंस्था/ कोलकाता
आगामी सुरू होणाऱया सैय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 लिग क्रिकेट स्पर्धेत बंगाल संघाचे नेतृत्व अनुभवी फलंदाज अनुष्टुप मजुमदारकडे सोपविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचा लहान भाऊ अष्टपैलू मोहम्मद कैफला या स्पर्धेत संधी देण्यात आली आहे.
यापूर्वी बंगाल संघाचे नेतृत्व अभिमन्यू ईश्वरनकडे होते. आता कर्णधारपदाची जबाबदारी मजुमदारकडे सोपविण्याचा निर्णय बंगाल क्रिकेट संघटनेने घेतला आहे. यापूर्वी मजुमदार बंगाल संघाचा उपकर्णधार होता. 36 वषीय अनुष्टुप मजुमदार याची सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेपुरतीच बंगाल संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली असून ईश्वरनवरील कर्णधारपदाचा भार थोडा कमी करण्याच्या हेतूने बंगाल क्रिकेट संघटनेने हा निर्णय घेतला आहे.
ईश्वरनने 2019-20 च्या क्रिकेट हंगामात बंगाल संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पहिल्यांदा पेलताना आपल्या संघाला रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारून दिली होती. पण दहा सामन्यात त्याच्या धावांची सरासरी 17.20 एवढी कमी झाली होती. त्याने केवळ एक अर्धशतक झळकविले होते. मजुमदारने आठ सामन्यात 58.66 धावांच्या सरासरीने 704 धावा जमविल्या होत्या. सर्वाधिक धावा जमविणाऱया फलंदाजांमध्ये मजुमदार दुसऱया स्थानावर होता. तर मनोज तिवारीने अकरा सामन्यातून 707 धावा जमवित पहिले स्थान मिळविले होते. गेल्या वषीच्या रणजी हंगामात बंगाल संघाला उपविजेतेपद मिळाले होते. भारताचा माजी कसोटीवीर व्ही. व्ही. एस. लक्ष्मण हा बंगाल संघाचा फलंदाज सल्लागार आहे. त्याचप्रमाणे मोहम्मद शमीचा लहान भाऊ मोहम्मद कैफला बंगाल संघात पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेतील बंगालचा सलामीचा सामना ओडिशा संघाबरोबर 10 जानेवारीला कोलकाता येथे होणार आहे.
बंगाल संघ- अनुष्टुप मजुमदार (कर्णधार), श्रीवत्स गोस्वामी (उपकर्णधार), ए. ईश्वरन, मनोज तिवारी, एस. चटर्जी, ईशान पोरेल, आर. रॉय चौधरी, विवेक सिंग, शहाबाज अहमद, अर्णब नंदी, मुकेशकुमार, आकाशदीप, अभिषेक दास, मोहम्मद कैफ, ए. चॅटर्जी, सुवंकर बाल, डब्ल्यू. चटर्जी, पी. बर्मन, कैफ अहमद, रविकांत सिंग.