ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यातील सुंबल ब्रिज भागात आज सकाळी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यावेळी झालेल्या स्फोटात 6 नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या स्फोटात परिसरातील काही वाहनांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, सुरक्षा दलांनी या भागात दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू केली आहे.