ऑनलाईन टीम / श्रीनगर :
सुरक्षा दलाने शोधमोहिमेदरम्यान काश्मीर खोऱ्यातील बांदीपोरामध्ये एलओसीजवळ शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. या कारवाईमुळे दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला असून, सुरक्षा दलाकडून या भागात शोधमोहीम सुरू आहे.
उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज येथील तारबल गावात नियंत्रण रेषेजवळ जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने शोध मोहीम सुरू केली होती. शोधमोहिमेदरम्यान तीन एके-47 रायफल्स, 12 एके-47 मॅगझिन, दोन पिस्तूल, चार पिस्तूल मॅगझिन, एकूण 550 काडतुसे, 18 ग्रेनेड आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले.