हवेची गुणवत्ता खालावली : प्रदुषणाची स्थिती गंभीर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
फटाक्मयांमुळे दिल्लीची हवा अधिकच प्रदुषित झाली आहे. दिल्लीत प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्मयांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र प्रशासन आणि सरकारच्या नियमांना धाब्यावर बसवत दिल्लीतील काही भागात मोठय़ा प्रमाणावर फटाके वाजवण्यात आले. वाढते प्रदूषण आणि कोरोनाचा धोका असतानाही शनिवारी दिवाळीनिमित्त नियम डावलून फटाके फोडण्यात आले.
दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने दिलेल्या माहितीनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांक शनिवारी रात्री 414 वरुन थेट 481 वर पोहोचला होता. अशाप्रकारे प्रदुषणाची पातळी वाढली तर दिल्लीकरांना अधिक धोका निर्माण होऊ शकतो. दिवाळीच्या दिवशी दिल्ली आणि आसपासचे प्रदूषण हे अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचले. बऱयाचशा भागांमध्ये फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आलेली असूनही लोक फटाके उडवत होते, असे हवामान विभागातील अधिकाऱयांनी सांगितले. दिल्लीतील प्रदुषणात 32 टक्के वाटा हा पेंढा जाळण्याचा आहे, असेही अधिकाऱयांनी सांगितले.