कंपनीकडून लाख मास्कची निर्मिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुडगांव येथे सेल्फ हेल्प गुपमध्ये काम करणाऱया महिलांना मास्क निर्मिती करण्याच्या व्यवसायासाठी जिल्हा प्रशासनाकडून मारुती सुझुकी इंडियाने 10 हजार मीटरचे कापड उपलब्ध करुन दिले आहे. मारूती कंपनी महिलांकडून मास्क तयार करवून घेणार आहे.
कोरोना विषाणुमुळे संसर्गजन्य रुग्णांची संख्या अधिक होण्याची भीती आहे. कोरोना खूप अधिक कालावधीपर्यंत राहणार असल्यामुळे प्रत्येकाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. धोकादायक परिस्थितीतचा अंदाज घेता आता अशा बचावात्मक उत्पादनांचा वापर करणे अनिवार्य असणार आहे. अशा उत्पादनांच्या निर्मितीमधून महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जात असल्याचे कंपनी व प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
1.5 लाख मास्क निर्मितीचे ध्येय
कंपनीच्या सीएसआरनुसार (सामाजिक उत्तरदायित्त्व) सदरचे कापड मास्क निर्मितीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हरियाणात जवळपास 1250 स्वयंरोजगार समूह कार्यरत असून यातील 10 ते 20 महिला सदस्य आहेत. जवळपास 13,500 महिलांच्या हाताला या उपक्रमामुळे काम मिळणार आहे. हिरो मोटो कॉर्प कंपनीकडूनही याप्रकारे मास्क तयार करुन घेतले जात आहेत.