प्रतिनिधी/ बेळगाव
अष्टमीला परंपरेनुसार बकऱयांचा बळी देण्याची प्रथा आहे. यामुळे शनिवारी बकरी मंडई येथे बकऱयांचा बाजार भरला होता. सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत बकऱयांचे व्यवहार तेजीत होते. बेळगाव सोबतच रायबाग, बैलहोंगल या परिसरातूनही बकरी बाजारात आली होती.
8 हजारांपासून 15 हजारांपर्यंत बकऱयांच्या वजनाप्रमाणे बोली लावण्यात येत होती. खरेदी करण्यासाठी बेळगावसह आसपासच्या भागातून नागरिक आले होते. आपल्याला परवडेल त्या दरात बकऱयांना बोली लावली जात होती. बऱयाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा बाजारात गर्दी झाल्याने विपेत्यांमध्ये समाधान होते.