आठ जणांचा मृत्यू
ऑनलाईन टीम / इराक :
बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी आहेत. इराकी सुरक्षा अधिकाऱयाने याबाबतची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी रात्री रॉकेट हल्ला झाला. तीन रॉकेटचा हल्ला झाल्याने त्याठिकाणच्या वाहनांना आग लागली. कमांडोसह आठ जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. टॉप कमांडर जनरल कासिम सोलेमानी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.