नवी दिल्ली : उद्योगपती संजीव गोयंका यांच्या मालकीच्या इंडियन सुपर लीग फुटबॉल प्रँचायझी एटीके-मोहन बागान फुटबॉल क्लबच्या संचालकपदाचा सौरभ गांगुलीने राजीनामा दिला. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टची अडचण येऊ नये, यासाठी त्याने हा निर्णय घेतला.
2022 आयपीएल स्पर्धेत नव्याने सहभागी होणाऱया लखनौ संघाचे संजीव गोयंका हे मालक आहेत. त्यामुळे, गांगुलीला हा निर्णय घ्यावा लागला. उद्योगपती गोयंका यांच्या आरपी-एसजी उद्योग समुहाने गेल्या सोमवारी आयपीएल 2022 च्या स्पर्धेसाठी लखनौ प्रँचायझीची 7090 कोटी रूपयांना खरेदी केली आहे.