वार्ताहर / वाळवा
वाळवा येथील सामाजिक कार्यकर्ते बजरंग पांडुरंग गावडे यांना ग्रुप ऑफ मीडियाचा २०२० चा समाज गौरव पुरस्कार कोल्हापूर येथे एका शानदार समारंभामध्ये प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहमध्ये हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला.
या समारंभासाठी प्रमुख उपस्थिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, आमदार मानसिंगराव नाईक, संपादक मंगेश मंत्री, टीव्ही मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार, भाग्यश्री कालेकर आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. बजरंग गावडे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्,र शाल व पुष्पहार देऊन या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते संग्राम पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व आष्ट्याचे माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, भाजप नेते वैभव शिंदे, अशोका अॅग्रोचे मालक सतीश पाटील, विशाल शिंदे आष्ट्याच्या नगराध्यक्षा स्नेहा माळी आदी अनेक मान्यवर या समारंभासाठी उपस्थित होते. बजरंग गावडे यांनी वाळवा परिसरांमध्ये युवा पिढी घडवण्यामध्ये फार मोलाचा वाटा उचलला असून व्यसनमुक्त समाज उभा करण्यामध्ये बजरंग गावडे यांचा मोठा सहभाग आहे, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी विविध उपक्रम राबवून फार मोलाची कामगिरी केली आहे