नवी दिल्ली
बजाज अलायन्ज जनरल इन्शुरन्स यांनी आपले व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तपन सिंघल यांचा कार्यकाळ आणखी 5 वर्षासाठी वाढवला आहे. कंपनीने नुकतीच यासंबंधीची माहिती दिली आहे. सिंघल यांचा नवा कार्यकाळ हा 1 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहे. गेल्या दशकभरापासून सिंघल यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने 350 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे.