बेंगळूर
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटोला तिसऱया तिमाहीत 23 टक्के इतका नफा कमावता आला आहे. कंपनीचा महसूलही सदरच्या कालावधीत वाढला आहे. पुण्यातील दुचाकी कंपनीचा ऑक्टोबर ते डिसेंबरच्या कालावधीतला नफा 23 टक्क्यांनी वाढून 1 हजार 556 कोटीवर पोहचला आहे. महसूल 17 टक्क्मयांनी वाढून 8 हजार 909 कोटी रुपयांवर पोहचला आहे. मागच्या वषी याच कालावधीत महसूल 8 हजार 619 कोटी रुपये होता. सलग दोन तिमाहीत कंपनीच्या उत्पन्न व महसुलात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे डिसेंबरला संपलेल्या तीन महिन्यात कंपनीची उलाढालही विक्रमी वाढली आहे.