पुणे
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटोने येणाऱया काळामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. याच्या अनुषंगाने येणाऱया काळामध्ये पुण्याजवळील आकुर्डी येथे इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासाठी 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे.
सदरच्या कारखान्यामध्ये कामाला सुरुवात झाली असून 5 लाख इतक्मया इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वार्षिक तत्त्वावर घेतले जाणार असल्याचे बजाज ऑटोने स्पष्ट केले आहे. स्थानिक बाजारपेठेसह विदेशामधील परिस्थितीनुसार आणि मागणीनुसार इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर भर दिला जाणार आहे.
पहिले वाहन जूनपर्यंत ?
यांच्या कारखान्यामधून उत्पादित केलेले पहिले इलेक्ट्रिक वाहन हे जून 2022 पर्यंत बाजारात दाखल होऊ शकते, असेही बजाज ऑटोने स्पष्ट केले आहे. सदरच्या कारखान्यामध्ये 800 जणांना रोजगाराची संधी दिली जाणार असल्याचे बजाज ऑटोने म्हटले आहे.