नवी दिल्ली
लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र कारखाने बंद असल्याने उत्पादन ठप्प होते. पण आता उत्पादन पुन्हा सुरू झाले असून बजाजच्या चेतक इलेक्ट्रीक स्कुटरचे बुकिंग ग्राहकांना करता येणे शक्मय होणार आहे. 95 कि. मी. अंतरचे मायलेज एका चार्जवर देणाऱया या स्कुटरची किंमत 1 लाख 15 हजार इतकी असेल. चाकण (पुणे) येथे कंपनीचा कारखाना असून महत्त्वाचे म्हणजे महिलाच या गाडीचे उत्पादन कार्य करतात. वर्षाच्या सुरुवातीला ही गाडी लाँच झाली पण त्यानंतर कोविडमुळे या गाडीच्या उत्पादन, विक्रीला, ब्रेक लागला. सध्या पुन्हा ऑन लाईन बुकिंग सुरू करण्यात आले आहे.