बेंगळूर :
कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर मार्च, एप्रिलमध्ये वाहन विक्री सुस्तावलेली असताना मेमध्ये काही प्रमाणात वाहन शोरूम्स सुरू झाली आहेत. मेमध्ये दुचाकी वाहन विक्रीत बजाजने हिरो मोटो कॉर्पला मागे टाकण्याचा विक्रम केला आहे. मे महिन्यात सर्वाधिक दुचाकी विक्री करण्याचा मान बजाजला मिळालाय.हिरो मोटो कॉर्प दुसऱया क्रमांकावर राहिली आहे. बजाजने स्थानिक बाजारात निर्यातीसह 1 लाख 12 हजार 798 वाहने मेमध्ये विकली आहेत तर या तुलनेत हिरोने 1 लाख 12 हजार 682 वाहने विकली आहेत. एप्रिलमध्येही बजाज विक्रीत आघाडीवर होती. एप्रिलमध्ये स्थानिक विक्रीऐवजी निर्यातच झाली आहे. बजाजने सलग सहाव्यांदा दुचाकींची जास्त निर्यात केली आहे. पल्सर आणि चेतकला परदेशात मागणी होते आहे.