नवी दिल्ली
वित्त क्षेत्रात कार्यरत असणाऱया बजाज फिनसर्व्ह कंपनीला पहिल्या तिमाहीत 44 टक्के इतका एकत्रित निव्वळ नफा झाल्याचे सांगण्यात येत आहे. जून 2020 संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा 1 हजार 215 कोटी रुपयांवर पोहचला आहे, जो मागच्या वर्षी याच कालावधीत 845 कोटी रुपये इतका होता. एकत्रित निव्वळ उत्पन्नही 16 टक्क्यांनी वाढून 14 हजार 192 कोटी रुपयांवर पोहचले आहे.