कोरोनाकाळात उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. अनेकांचे पगार वेळेवर होत नाहीत. नोकर्याही संकटात आहेत. अशा वेळी आवश्यक तेवढी आणि विचारपूर्वक खरेदी करायला हवी. वाढत्या महागाईत बजेटमधली खरेदी वाटते तितकी सोपी नाही. मात्र तुम्ही थोडं कौशल्य वापरलं तर बर्याच गोष्टी सहज साध्य होतील.
खरेदीला जाताना यादी करणं गरजेचं आहे. यादी नसेल तर नको असलेल्या वस्तूही आणल्या जातात. मग गरजेच्या वस्तूंसाठी पैसे कमी पडतात. अशा वेळी नेमकी गरज ओळखून आवश्यक वस्तूंची खरेदी करा. ऑनलाईन खरेदी करतानाही यादी जवळ ठेवा.
* विविध ब्रँड्स सवलती जाहीर करतात. ई कॉमर्स साईट्सवर तर महाग वस्तू स्वस्तात मिळतात. यासाठी विविध शॉपिंग साईट्सना भेटी द्या. बाजारात चक्कर टाकून सवलतींबाबत जाणून घ्या. मगच खरेदी करा. इथे तुमची बरीच बचत होऊ शकते.
* खरेदीला जाण्याआधी बजेट ठरवून घ्या. बजेटपेक्षा अधिक खर्च होत असेल तर अनावश्यक वस्तू बाजूला ठेवा. यामुळे महिन्याचा खर्च आवाक्याबाहेर जाणार नाही.
* बर्याच महिला सतत बाजारात जाणं टाळण्यासाठी एकाच वेळी सगळी खरेदी करतात. मात्र यामुळे खर्च आवाक्याबाहेर जातो. एका वेळी थोडय़ा वस्तू खरेदी करा. सणासुदीच्या काळात सवलती जाहीर होत असतात. त्यामुळे भविष्यासाठी लागणार्या वस्तूंच्या खरेदीसाठी थोडं थांबा.
* खरेदी करणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. तुमच्याकडे खरेदीचं कौशल्य असायला हवं. मुख्य म्हणजे पुरेसा वेळ द्यायला हवा. तुम्ही ऑनलाईन खरेदी करा किंवा बाजारहाट करा,थोडं संशोधन केलं तर पैशांची बचत होऊ शकते.