ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामधून त्यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला. करदात्यांना दिलासा देताना काही वस्तू आणि सेवांचे दर वाढवण्यात आले आहेत. तर काही वस्तू आणि सेवा स्वस्त करण्यात आल्या आहेत. हे नवे दर 1 एप्रिलपासून लागू होतील.
महाग झालेल्या वस्तू :
सिगारेट, तंबाखू पदार्थ, वैद्यकीय उपकरणं, मोबाईल, वाहनं आणि वाहनांचे सुटे भाग, फूटवेअर, फर्निचर, वॉल फॅन्स, चायना सिरॅमिक, स्टील, तांब्यापासून तयार करण्यात येणारी क्रॉकरी, स्वयंपाकाची भांडी
स्वस्त झालेल्या वस्तू :
लाईट वेट कोटेड पेपर, न्यूजप्रिंट, सोया फायबर, सोया प्रोटीन.