लवकरच खासदार उदयनराजेंच्या हस्ते होणार उद्घाटन
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयात अनेक सेल्फी पॉईंट नव्याने उभे राहत आहेत. असाच एक पोवई नाक्यावर मरिआई कॉम्प्लेक्सच्या कोपऱयात बटरफ्लॉय पाँईंट उभा राहिला आहे. त्या पाँईटवर उद्घाटनापूर्वीच अनेकांनी फोटो काढले. त्यावर सातारकरांनी 22 केव्हीचा डीपीला लागूनच बटरफ्लाय पॉईंट सुरु केल्याने धोका निर्माण होवू शकतो, अशा टीप्पण्या केल्या. तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करताच त्या पॉईंटला कुंपण घालून बंदिस्त असे करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. लवकर खासदार उदयनराजेंच्या हस्ते या पॉईंटचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पोवई नाक्यावर मरिआई कॉम्लेक्सच्या कोपऱयावर 22 केव्हीचा डीपी आहे. याच डीपीच्या परिसरात कचरा दररोज टाकला जायचा. त्यामुळे सगळा परिसर अस्वच्छ दिसयचा. कचरा टाकणारेही तेथीलच असायचे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी नगरसेवक श्रीकांत आंबेकर यांच्या संकल्पनेतून व्यापाऱयांनी तेथे बटरफ्लाय पाँईंट सुरु करण्यासाठी काम सुरु केले. गेल्या दोन दिवसात हे काम वेगाने सुरु करण्यात आले. अंतिम टप्यात काम आले असून त्या पाँईंटचे फोटो सोशल मीडियावर झळकताच अनेक सातारकरांनी स्वतःच्या कॅमेऱयात फोटो टिपले. परंतु त्यावर टीप्पणीही झाली. लगतच डीपी असल्याने धोका उदभवू शकतो. त्याबाबतचे तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करताच हा पाँईटच कुंपणामध्ये बंदिस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात या पाँईटचे उद्घाटन खासदा उदयनराजेंच्या हस्ते करण्यात येणार आहे.