ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिह्यातील श्रीनगर एअरपार्ट रोडवर सुरक्षा दलांनी आयईडी बॉम्ब शोधून काढत दहशतवादी कट उधळून लावला. बॉम्ब शोधक पथकाने तात्काळ हा बॉम्ब निकामी केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घातला असून, शोधमोहिम सुरू आहे.
बडगामच्या हुम्हामा येथील गोगू भागातील श्रीनगर-एअरपोर्ट रोडवर सोमवारी सायंकाळी सुरक्षा दलांनी 6 किलोचा आयईडी बॉम्ब शोधून काढला. बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीने हा बॉम्ब निकामी करण्यात आला. सध्या सुरक्षा दल या भागात शोध मोहीम राबवत आहेत.