ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या बडगाममधील अरिबाग मचामा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. या कारवाईत एक जवान जखमी झाला आहे.
अरिबाग मचामा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्रीपासून या परिसरात शोधमोहीम सुरू होती. आज सकाळी जवानांची चाहूल लागताच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. एक जवान या कारवाईत जखमी झाला आहे.
जवानांनी ठार केलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी निगडित होते. एक पाकिस्तानचा तर दुसरा पुलवामाचा रहिवाशी असल्याचे काश्मीरचे आयजी विजयकुमार यांनी सांगितले