‘हरहर महादेव’चा जयघोष : मठाधीश नागेंद्रस्वामी यांच्या हस्ते पूजन : भाविकांनी घेतले दर्शन
वार्ताहर /किणये
तारिहाळ येथील पावन क्षेत्र बडेकोळ मठात सोमवारी रथोत्सव मिरवणूक भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. मठात श्रावणमासानिमित्त रोज अभिषेक व धार्मिक विधी करण्यात आले. शेवटचा श्रावण सोमवार व अमावास्या असल्याने दरवर्षीप्रमाणे रथोत्सव यात्रा झाली.
या यात्रेत कोरोना नियमावलीचे पालन करण्यात आले. दरवषी यात्रेसाठी कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा येथून भाविक मोठय़ा संख्येने सहभागी होतात. मात्र, कोरोनामुळे गेल्यावर्षी व यंदाही महाराष्ट्र व गोवा येथून भाविक आले नाहीत.
सोमवारी सकाळी रुद्राभिषेक, पादुका पूजन व विविध धार्मिक विधी करण्यात आले. मठात दर सोमवारी व अमावास्येच्या दिवशी भक्तांची गर्दी असते. देवस्थान जागृत असल्याने तालुक्मयातील भाविकांची अपार श्रद्धा आहे.
मठाधीश नागेंद्र स्वामी यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली. रथोत्सव मिरवणुकीसाठी रथाची सजावट करण्यात आली होती. हर हर महादेवच्या जयघोषात मिरवणुकीला सुरुवात झाली. दिवसभर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
नामस्मरण करणे गरजेचे
सध्याच्या धावपळीच्या व स्पर्धात्मक युगात मनुष्य चिंताग्रस्त बनला आहे. मानसिक समाधानासाठी भगवंताचे नामस्मरण करणे गरजेचे आहे. बडेकोळमठात अभिषेकाच्या माध्यमातून भाविकांसाठी उत्तम आरोग्य, सुख समाधान लाभावे यासाठी महादेवाकडे प्रार्थना करण्यात आली.