वृत्तसंस्था/ बडोदा
आगामी रणजी क्रिकेट हंगामासाठी बडोदा संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू तसेच विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱया संघाचे प्रशिक्षक डेव्ह व्हॅटमोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बडोदा क्रिकेट संघटनेने शुक्रवारी व्हॅटमोर यांची प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. 67 वषीय व्हॅटमोर यांना क्रिकेट क्षेत्रातील बऱयाच वर्षांचा अनुभव असून ते 1996 साली झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्मयपद मिळविणाऱया श्रीलंका संघाचे प्रमुख प्रशिक्षक होते. भारतीय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये यापूर्वी व्हॅटमोर यांनी विविध संघांना मार्गदर्शन केले आहे. केरळ संघाला काही काळ त्यांचे मार्गदर्शन लाभले होते. यापूर्वी व्हॅटमोर हे नेपाळ क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते.