महसूल वसुलीसाठी मनपा आयुक्तांची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या खजिन्यात महसूल जमा होत नसल्याने महसूल वाढीसाठी आयुक्तांनी प्रयत्न चालविले आहेत. घरपट्टी वसुलीसाठी आवश्यक उपाय योजना राबवा अशी सूचना करून बडय़ा थकबाकीदारांच्या अस्थापनांसमोर हलगी वाजवा असा आदेश महसूल विभागाच्या अधिकाऱयांना बजावला. तसेच महापालिकेच्या खुल्या जागांवरील अतिक्रमण हटवून तारेचे कुंपन घालून फलक लावा अशी सूचना केली.
महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या महसूल विभागातील कर्मचाऱयांची बैठक घेऊन महसूल वाढीसाठी प्रयत्न करण्याची सूचना 15 दिवसांपूर्वी केली होती. सोमवारी महसूल विभागाच्या अधिकाऱयांची व कर्मचाऱयांची बैठक आयोजित करून आढावा घेतला. 45 कोटी घरपट्टी वसूल करण्याचे उद्दी÷ महापालिकेने ठेवले आहे. यापैकी आतापर्यंत 25 कोटी 80 लाख रूपये घरपट्टी जमा झाली आहे. ऊर्वरित घरपट्टी वसुलीसाठी आवश्यक उपाय योजना राबविण्याची सूचना महसूल निरीक्षक आणि वॉर्ड क्लार्कना केली. थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची भेट घेऊन चलन देण्याची सूचना केली. तसेच बडय़ा थकबाकीदारांकडून घरपट्टी वसुलीसाठी कारवाईचा आदेश बजावला. तसेच वर्षानुवर्षे घरपट्टी थकविलेल्या थकबाकीदारांच्या आस्थापनासमोर हलगी वाजविण्यासारखे उपक्रम राबवा असा आदेश आयुक्तांनी बजावला.
तसेच शहरातील विविध ठिकाणी महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा आहेत. पण यावर अतिक्रमण झाले आहे. मनपाच्या खुल्या जागांचा शोध घेऊन तारेचे कुंपन घालावे, तसेच मनपाचा फलक लावण्याची सूचना आयुक्तांनी केली. ठिकठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. याबाबत कारवाई झाली नसल्याने आयुक्तांनी खंत व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत सर्व अनधिकृत फलक हटविण्यात यावेत, तसेच इमारतीवर असलेल्या जाहिरात फलकाचा शुल्क वसुल करण्यासाठी कारवाई करण्याची सूचना केली.
ई अस्ती प्रणालीनुसार चलन देण्यासाठी केवळ सहाय्यक महसूल अधिकाऱयांना लॉग-ईन आयडी देण्यात आली आहे. त्यामुळे महसूल निरीक्षकांना चलन वितरण करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. सहाय्यक महसूल अधिकारी अनुपस्थित असल्यास नागरिकांना घरपट्टी चलन मिळत नाही. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशी माहिती महसूल अधिकाऱयांनी मनपा आयुक्तांना दिली. घरपट्टी चलन देण्यासाठी महसूल निरीक्षकांनाही लॉग- ईन आयडी देण्याची विनंती महसूल निरीक्षकांनी केली. याबाबत प्रस्ताव तयार करून नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत नगरविकास खात्याकडुन मंजुरी मिळाल्यानंतर महसूल निरीक्षकांनाही लॉग-ईन आयडी देण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली.
यावेळी बैठकीला महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर, महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर, सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल निरीक्षक, वॉर्ड क्लार्क व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.