अक्कलकोट / प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील बणजगोळ येथे मागील भांडणाचा राग मनामध्ये धरून व पाण्याची मोटार का चालू केली या कारणावरून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी दि २२ जानेवारी रोजी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,बणजगोळ येथे दि १९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास मागील भांडणाचा राग मनामध्ये धरून व पाण्याची मोटार का चालू केली या कारणावरून दोन गटात मारामारी झाली. यात वेळूच्या काठीचा व कुऱ्हाडीच्या दांडक्याचा वापर करण्यात आला. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी बारा संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. प्रकाश गुरण्णा खांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित गंड्यप्पा अमृत व्हसुरे, रेवप्पा अमृत व्हसुरे, सुनिल जयराम मुळे, अमृत रेवप्पा व्हसुरे, खंडप्पा सिध्दण्णा व्हसुरे, जयराम गंगण्णा मुळे, सर्व रा. बणजगोळ, ता.अक्कलकोट तसेच रेवप्पा अमृत व्हसुरे रा. बणजगोळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित प्रकाश खांडेकर, शिवकुमार राजेंद्र खांडेकर, शशिकुमार रांजेद्र खांडेकर, दौलप्पा गुराण्णा खांडेकर, अंबरिस अशोक मेळकुदे, चंद्रकांत शिवपुत्र मेळकुदे सर्व रा.बणजगोळे ता. अकक्लकोट यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी व पो.ना. राठोड