संशयित आरोपीची कबुली
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मैथिली गवाणकर हिच्या खून प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आह़े ‘माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असल्याची गावात बोंब करेन’ अशी धमकी मैथिली हिने दिली होत़ी त्यामुळे आपली बदनामी होणार, या भीतीने मैथिलीचा कायमचा काटा काढल्याची कबुली संशयित आरोपीने पोलिसांजवळ दिल़ी
नीलेश उर्फ उक्कू प्रभाकर नागवेकर (35, खेडशी, भंडारवाडी) याला मैथिलीच्या खून प्रकरणी अटक करण्यात आली आह़े गुरूवारी त्याला न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 9 सप्टेंबर 2019 रोजी मैथिली प्रवीण गवाणकर (16, खेडशी चिंचवाडी) हिचा गावातील मोडा जंगलात डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होत़ा सुमारे 1 वर्षाच्या तपासानंतर संशयित आरोपीला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व ग्रामीण पोलिसांना यश आल़े
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मैथिली बकऱया चरवण्यासाठी घराशेजारी असलेल्या मोडा जंगलात गेली होत़ी याचदरम्यान नीलेश आपल्या आतेच्या जागेतून जात होत़ा यावेळी त्या जागेत चरणाऱया काही बकऱया त्याला दिसल्या. नीलेशने त्यातील एक लहान बकरी आवडल्याने उचलून घेतल़ी हे पाहताच मैथिलीने नीलेशला तू आमची बकरी चोरी करतोस़, बकरी खाली ठेव, नाहीतर तू माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतोस, अशी गावात बोंब मारण्याची धमकी दिल़ी तेव्हा नीलेश घाबरून त्या ठिकाणाहून निघून गेला होत़ा
दरम्यान मैथिली आपली गावात बदनामी करेल, या भीतीने नीलेश अस्वस्थ होत़ा मैथिलीचा कायमचा काटा काढण्याचा विचार त्याच्या मनात घर करू लागल़ा मैथिलीला संपवण्याच्या इराद्याने नीलेश पुन्हा घटनास्थळी आल़ा यावेळी मोबाईलवर खेळत असलेली मैथिली नीलेशने पाहिल़ी आजूबाजूला कोणी नाही, याची शहानिशा करत तो चोरपावलाने पाठीमागून मैथिलीजवळ गेला व जवळचा जांभा दगड तिच्या डोक्यात घातल़ा
दगडाच्या प्रहाराने निपचित पडलेल्या मैथिलीला ओढत नीलेशने जवळच्या झुडूपात नेल़े अमैथिली मृत झाल्याची खात्री करण्यासाठी त्याने पुन्हा तिच्या डोक्यात दगड मारून डोक्याचा चेंदामेंदा करण्याचा प्रयत्न केला, अशी हकीगत संशयित आरोपीने पोलिसांना प्राथमिक तपासात दिल़ी दरम्यान संशयित आरोपीने दिलेली कबुली व त्या बाबत दिलेले स्पष्टीकरण पोलिसांना पटत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. अजूनही आरोपी पोलिसांना विसंगत व उडवाउडवीची उत्तरे देत आह़े परंतु लवकरच सर्व बाबींचा खुलासा होण्याचा विश्वास पोलीस अधिकाऱयांना आहे. त्यामुळे या खूनाबाबत आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आह़े