तेजस कोळेकर यांनी मांडले विचार
प्रतिनिधी/ बेळगाव
ध्येयाच्या दिशेने वाटचाल केल्यास आपल्याला यशस्वी होण्यास मदत होते. सुरवंटही आपल्यामध्ये बदल घडवून आपले जीवन फुलविले. जोपर्यंत आपण आपल्यामध्ये बदल घडवित नाही तोवर आपला विकास होणार नाही, असे विचार संस्कृती एज्युकेअरचे संस्थापक तेजस कोळेकर यांनी व्यक्त केले.
देशमुख रोड, टिळकवाडी येथील संस्कृती एज्युकेअरच्या कार्यालयात नुकत्याच झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. संस्थेतर्फे नागरिकांसाठी विनामूल्य सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या कार्यशाळेत त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
अनेकजण तणाव, कौटुंबिक कलह, आर्थिक नुकसान, शारीरिक व्याधी, शिक्षण, बेरोजगारी अशा अनेक चिंतांनी ग्रस्त असतात. यातून बाहेर पडण्यासाठी सकारात्मक विचार महत्त्वाचा आहे. स्वतःमध्ये नवनवीन बदल केल्यास अनेक समस्या सोडविण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.