राधानगरी /प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील बनाचीवाडी येथील शंकर गोविंद काशीद या पशुपालकाच्या म्हैशीने ८ पाय, ३ कान, २ शेपूट आणि १ तोंड असलेल्या आश्चर्यकारक रेडकाला मृतावस्थेत जन्म दिला. आकाराने बेडब असलेल्या रेडकाला बाहेर काढण्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टराना म्हैशीची शस्त्रक्रिया करावी लागली.
दरम्यान, रेडकाला बाहेर काढण्यासाठी किचकट शस्त्रक्रिया करावी लागली. हि शास्त्रकिया गोकुळ संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एम. पोवार, डॉ. डांगे यांनी केल. त्यांना राधानगरी येथील पशुवैद्यकीय अधिकारी सचिन कांबळे व ग्रामस्थांनी मदत केली. या म्हैशीवर शस्त्रक्रिया करून म्हैशीला जीवदान देण्यात यश आले असले तरी म्हैस अध्याप बेशुद्ध अवस्थेत होती.