देवरूख-मुरादपूरमधील प्रकार -5 जणांविरूद्ध गुन्हा
प्रतिनिधी / रत्नागिरी
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख-मुरादपूरमध्ये जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर जमिनीची विक्री करून फसवणूक केल़ी जमीन विक्रीप्रकरणी दमदाटी केल्याची तक्रार देवरूख पोलिसांत दाखल करण्यात आली आह़े दत्ताराम गुणाजी बांडागळे (65, ऱा मुरादपूर संगमेश्वर) यांनी देवरूख पोलिसांत फसवणूक व दमदाटीची तक्रार दाखल केली आह़े संतोष कृष्णा केदारी (ऱा मधलीआळी देवरूख), मानसी मनोहर पोकळे (ऱा कांदीवली मुंबई), अनघा अजित घाणेकर (ऱा कराड ), अश्विनी अजित जोशी (ऱा भाईंदर मुंबई), रचना अमित वाटवे (ऱा आकुर्डी पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़ या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मुरादपूर सर्व्हे नंबर 10 येथे कुळवहिवाटीची जमीन आह़े या जमिनीची संशयित आरोपी यांनी 1 जानेवारी 2011 ते 31 डिसेंबर 2016 दरम्यान बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची लाखो रूपयांना विक्री केल़ी दरम्यान हा प्रकार बांडागळे यांना समजताच त्यांची आरोपी यांना जाब विचारल़ा मात्र या प्रकरणी आरोपी यांच्याकडून दमदाटी करण्यात आल्याची तक्रार बांडागळे यांनी देवरूख पोलिसांत दाखल केल़ी या प्रकरणी पुढील तपास देवरूख पोलिसांकडून करण्यात येत आह़े.
रत्नागिरीत बनावट आधार, पॅनकार्डने दुकानदारांची फसवणूक
बनावट पॅनकार्ड व आधारकार्डचा वापर करीत रत्नागिरीतील विविध मोबाईल दुकानातून लोनवर मोबाईल खरेदी करीत दुकानदारांना चुना लावण्याच्या घटना रत्नागिरीत उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. सध्या फायनान्स कंपनीद्वारे रत्नागिरीतील अनेक मोबाईल विक्रेते सुलभ हप्त्यांवर ग्राहकांना मोबाईल देतात. अनेकजण या सुविधेचा फायदा घेत महागडे मोबाईल खरेदी करतात. यासाठी दुकानदार संबंधित ग्राहकाकडून पॅनकार्ड व आधारकार्ड झेरॉक्स घेतात व सीबील स्कोअर चेक करून त्या ग्राहकाला सुलभ हप्त्यांवर मोबाईल दिला जातो. मात्र काही भामटय़ांनी दुसऱया नावाची डय़ुप्लिकेट पॅनकार्ड बनवून त्यावर आपला फोटो लावून रत्नागिरीतील अनेक दुकानातून महागडे मोबाईल खरेदी केल्याच्या घटना आता उघडकीस येऊ लागल्या आहेत. लोनवर दिलेल्या मोबाईलचा पहिला हप्ता थकल्यावर ही बाब दुकानदारांच्या लक्षात आली आहे. मोबाईल हप्त्यांवर देताना ग्राहकाने हप्ते वेळेवर न भरल्यास त्या दुकानदाराला ते हप्ते भरावे लागत असल्याने आता ही घटना घडल्यावर फायनान्स कंपनीनेही आपले हात वर केले आहेत. अशा पद्धतीने दुकानदारांना गंडा घालणारी ही टोळी रत्नागिरीत कार्यरत झाली असून त्यांनी गंडा घातलेल्या काही घटना आता उघडकीस आल्या आहेत. या मोबाईल दुकानदारांनी विकलेल्या मोबाईलचा आयएमई नंबरद्वारे तपास केला असता हे मोबाईल परराज्यात अ?क्टिव्हेट असल्याचे दिसत आहे. आता या फसलेल्या दुकानदारांनी पोलिसांत धाव घेतली असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.