ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान एक जुना व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर मागच्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. त्या दरम्यान, काँग्रसचे नेते दिग्विजय सिंह यांनी कथित व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला. त्यानंतर आणखी 11 जणांनी तो रिट्विट केला. या प्रकरणावरून भाजपच्या नेत्यांनी तक्रार केल्यामुळे दिग्विजय सिंह यांच्यासह 11 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 12 जानेवारी 2020 रोजी तत्कालीन कमलनाथ सरकारच्या मद्य विषयक धोरणावर टीका करत 2 मिनिट 19 सेकंदाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर त्यांच्या त्या व्हिडिओमध्ये काही बदल करून 9 सेकंदाचा एक व्हिडिओ तयार केला. तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणत शेअर केला गेला. त्यात असे दाखवण्यात आले होते की, त्यावेळचे मुख्यमंत्री असे सांगत आहेत की, लोकांनी दारू भरपूर प्यायली पाहिजे.
दरम्यान, आता भाजपच्या तक्रारीनंतर भोपाळ गुन्हा शाखेने दिग्विजय सिंह यांच्यासोबतच हा व्हिडिओ रिट्विट करणाऱ्या 11 जणांवर देखील एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच पुढील कारवाई सुरू आहे.