बेंगळूर
बनावट स्टँपची विक्री करणाऱया टोळीला गजाआड करण्यात बेंगळूर शहर पोलीस यशस्वी ठरले आहेत. या प्रकरणी हुसेन मोदी उर्फ छोटा तेलगी, हरिष, सीमा आणि नजमा फातिमा या चौघांना अटक करण्यात आली आहे. या टोळीतील आणखी एक संशयित आरोपी फरार आहे. आरोपींकडून 10 डीटीपी, संगणक, पिंटर, 443 पेपर व रोख रक्कम असा एकूण 2 कोटी 71 लाख 81 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 2002 मध्ये बंदी घालण्यात आलेल्या स्टँप पेपरच्या रंगीत झेरॉक्स तयार करून ही टोळी विक्री करीत होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.