नवी दिल्ली
खाद्यपदार्थात बर्गरचे स्थान वरचे आहे. या बर्गरच्या विश्वात नाव असणाऱया बर्गर किंग कंपनीला आगामी काळात आपला आयपीओ आणायचा आहे. याकरिता कंपनीने सेबीकडे रीतसर अर्ज दाखल केला आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 542 कोटी रुपये जमवणार आहे. कंपनीत वाटा उचलणाऱया क्मयूएसआर एशिया 6 कोटी समभागांची विक्री या आयपीओत करणार आहे. भांडवली बाजारात आयपीओ आणण्याकरिता प्रथम रीतसर अर्ज सेबीकडे सादर करण्यात आलाय. मंजुरी मिळाल्यावर आयपीओ सादरीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.