नवी दिल्ली
बर्गरच्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेल्या बर्गर किंग इंडियाचा आयपीओ भांडवली बाजारात दाखल झाला असून त्याला बाजारात जबरदस्त प्रतिसाद गुंतवणुकदारांनी दिला असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत 156 पट अधिक प्रतिसाद इश्युला मिळाल्याचे समजते. बुधवारी कंपनीचा इश्यू बाजारात दाखल झाला असून शुक्रवारी बंद झाला आहे. कंपनी या आयपीओअंतर्गत 7 कोटी 44 लाख 91 हजार 524 शेअर्सची विक्री करणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांनी बर्गर किंगच्या आयपीओला चांगला प्रतिसाद दिला. आयपीओच्या माध्यमातून कंपनी 450 कोटींचे नवे समभाग सादर केले.