नवी दिल्ली
रंग उत्पादनात आघाडीवर असणारी बर्जर पेंटस् आपल्या रंगांची किंमत वाढवणार असल्याचे समजते. सदरची नवी वाढ 1 सप्टेंबरपासूनच अंमलात आणली जाणार असल्याची माहिती आहे. कच्च्या साहित्याच्या किंमतीत झालेली वाढ तसेच उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे कंपनीला सदरची किमत वाढवावी लागते आहे. मेमध्ये यापूर्वी रंगाच्या किंमती वाढवल्या होत्या. 1 सप्टेंबरपासून किंमतीत 6.5 टक्के इतकी वाढ होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.