वृत्तसंस्था/ मुंबई
बांधकाम क्षेत्रातल्या हालचालींनी गती पकडली असल्याने रंगाच्या मागणीमध्ये अलीकडच्या काळामध्ये चांगलीच वाढ झाली आहे. हीच संधी लक्षात घेऊन बर्जर पेंट्सने देशामध्ये रंग उत्पादनात वाढीसोबत व्यवसाय विस्तारावर लक्ष देण्याचे निश्चित केले आहे.
देशातील दुसऱया नंबरची मोठी रंग उत्पादक कंपनी म्हणून बर्जर पेंट्सचा उल्लेख होतो. बर्जर पेंट्सने उत्तर प्रदेशमध्ये 700 कोटी रुपये खर्चून रंग उत्पादनाचा कारखाना सुरू करण्याचे निश्चित केले आहे. यासाठीची तयारी कंपनीने सुरू केली असून लवकरच कारखान्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रंगाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून ही गरज पूर्ण करण्यासाठी उत्पादन क्षमतेत वाढ करणे अपरिहार्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यासाठीच कारखाना उभारणे हा एकमेव पर्याय असणार आहे. पुढच्या वषी एप्रिलमध्ये कारखाना सुरू करण्याचा विचार होता. परंतु त्यात आता बदल करून याचवषी डिसेंबरपर्यंत कारखाना कार्यान्वीत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे कंपनीने निश्चित केले आहे. तिसऱया तिमाहीमध्ये रंगाची मागणी 32 टक्के इतकी वाढली आहे. येणाऱया काळात बांधकाम क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये हालचाली वाढणार असून रंगाच्या मागणीतही वाढीचे संकेत दिसत आहेत. हीच वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी आगामी काळात व्यवसाय विस्तारावर कंपनी भर देणार आहे. तिसऱया तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यामध्ये 25 टक्के इतकी वाढ झाली आहे.