ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना मागे टाकत लुई विटनचे सर्वेसर्वा बर्नार्ड अर्नाल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत ते पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 19,890 कोटी डॉलर एवढी आहे. तर जेफ बेजोस यांची एकूण संपत्ती 19,490 कोटी डॉलर आहे.
अर्नाल्ट यांच्या मालकीची लुई विटन ही फ्रान्सची जगप्रसिद्ध कंपनी आहे. ही कंपनी कॉस्मेटिक्स, ॲक्सेसरीज, परफ्युम, घड्याळे, दागिने, कपडे, वाईन तयार करते. या कंपनीचा व्यवसाय मोठया प्रमाणात वाढला आहे. कंपनीचे शेअर्सही वधारले आहेत. त्यामुळेच अर्नाल्ट हे जगातील श्रीमंतांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आले आहेत.