वृत्तसंस्था/ बर्लीन
डबल्यूटीए टूरवरील रविवारी येथे झालेल्या बर्लीन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय ग्रास कोर्ट टेनिस स्पर्धेत सॅम्सोनोव्हाने एकेरीचे जेतेपद मिळविताना स्वीसच्या बेनसिकचा पराभव केला.
या स्पर्धेतील झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सॅम्सोनोव्हाने स्वीसच्या पाचव्या मानांकित बेनसिकचा 1-6, 6-1, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव केला. 22 वर्षीय सॅम्सोनोव्हाचे डब्ल्यूटीए टूरवरील हे पहिले विजेतेपद आहे. रशियाच्या सॅम्सोनोव्हाने या स्पर्धेत उपांत्य सामन्यात बेलारूसच्या अझारेंकाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.