जैस्वाल-दुबेच्या अर्धशतकासमोर ऋतुराजचे 60 चेंडूतील शतकही फिके!
अबु धाबी / वृत्तसंस्था
यशस्वी जैस्वाल (21 चेंडूत 50) व शिवम दुबे (42 चेंडूत नाबाद 64) यांच्या झंझावाती अर्धशतकांसमोर ऋतुराज गायकवाडचे 60 चेंडूतील धडाकेबाज शतकही फिके पडले आणि शनिवारी धावांच्या आतषबाजीत रंगलेल्या आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सने 7 गडय़ांनी एकतर्फी विजय नोंदवला. प्रारंभी, चेन्नईने 20 षटकात 4 बाद 189 धावांचा डोंगर रचला तर राजस्थानने देखील तोडीस तोड प्रत्युत्तर देत 17.3 षटकात 3 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले. या लढतीत दोन्ही संघांनी एकत्रित 33 चौकार, 18 षटकारांसह तब्बल 389 धावा चोपल्या.
वास्तविक, ऋतुराजच्या नाबाद 101 धावांच्या खेळीनंतर चेन्नईने 20 षटकात 4 बाद 189 धावांचा डोंगर रचला, त्यावेळी सातव्या स्थानावरील राजस्थान कितपत प्रतिकार करु शकेल, याबाबत साशंकताच होती. पण, प्रत्यक्षात जैस्वाल व व शिवम दुबे यांनी झंझावाती अर्धशतके झळकावली आणि राजस्थानने पाहता पाहता अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणला. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक स्पृहणीय विजय ठरला.
धावफलक
चेन्नई सुपरकिंग्स ः ऋतुराज गायकवाड नाबाद 101 (60 चेंडूत 9 चौकार, 5 षटकार), फॅफ डय़ू प्लेसिस यष्टीचीत सॅमसन, गो. तेवातिया 25 (19 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), सुरेश रैना झे. दुबे, गो. तेवातिया 3 (5 चेंडू), मोईन अली यष्टीचीत सॅमसन, गो. तेवातिया 21 (17 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अम्बाती रायुडू झे. फिलीप्स, गो. साकरिया 2 (4 चेंडू), रविंद्र जडेजा नाबाद 32 (15 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार). अवांतर 5. एकूण 20 षटकात 4 बाद 189.
गडी बाद होण्याचा क्रम
1-47 (प्लेसिस, 6.5), 2-57 (रैना, 8.3), 3-114 (मोईन अली, 14.3), 4-134 (रायुडू, 16.2).
गोलंदाजी
आकाश सिंग 4-0-39-0, चेतन साकरिया 4-0-31-1, मुस्तफिजूर रहमान 4-0-51-0, राहुल तेवातिया 4-0-39-3, मयांक मार्कंडे 3-0-26-0, ग्लेन फिलीप्स 1-0-3-0.
राजस्थान रॉयल्स ः इव्हिन लुईस झे. हॅझलवूड, गो. शार्दुल 27 (12 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), यशस्वी जैस्वाल झे. धोनी, गो. असिफ 50 (21 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार), संजू सॅमसन झे. गायकवाड, गो. शार्दुल 28 (24 चेंडूत 4 चौकार), शिवम दुबे नाबाद 64 (42 चेंडूत 4 चौकार, 4 षटकार), ग्लेन फिलीप्स नाबाद 14 (8 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार). अवांतर 7. (लेगबाय 1, नोबॉल 2, वाईड 4). एकूण 17.3 षटकात 3 बाद 190.
गडी बाद होण्याचा क्रम
1-77 (इव्हिन लुईस, 5.2), 2-81 (जैस्वाल, 6.1), 3-170 (सॅमसन, 15.4).
गोलंदाजी
सॅम करण 4-0-55-0, जोश हॅझलवूड 4-0-54-0, शार्दुल ठाकुर 4-0-30-2, केएम असिफ 2.1-0-18-1, मोईन अली 2.2-0-23-0, रविंद्र जडेजा 1-0-9-0.