प्रतिनिधी/ बेळगाव
लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या शहर सशस्त्र दलातील पोलिसाची बुधवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पाच दिवसांपूर्वी त्याच्यावर एफआयआर दाखल झाला होता.
इम्रानखान अब्दुलमुनाफ घोरी (वय 27, रा. पोलीस क्वॉर्टर्स, वीरभद्र मंदिराजवळ, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. शनिवारी अटक करून सायंकाळी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. बुधवारी पोलीस अधिकाऱयांनी त्याला एक दिवस कोठडीत घेऊन पुन्हा त्याची वैद्यकीय तपासणी केली.
सशस्त्र दलातील पोलीस व पीडित तरुणी दोघेही हुक्केरी तालुक्मयातील राहणारे आहेत. इम्रानखान हा सध्या पोलीस क्वॉर्टर्समध्ये राहतो. तर पीडित तरुणीही बेळगावात राहते, अशी माहिती मिळाली आहे. गेल्या एक महिन्यापासून हे प्रकरण ठळक चर्चेत होते. लग्नाचे आमिष दाखवून या पोलीस तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.