@ क्वेटा
पाकिस्तानच्या अशांत बलूचिस्तान प्रांताच्या सिबी जिल्हय़ात मंगळवारी एक स्फोट झाला आहे. या स्फोटात किमान 3 जणांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याच संघटनेने स्वीकारलेली नाही. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बलुचिस्तानात दीर्घकाळापासून हिंसक घडामोडी घडत राहिल्या आहेत. बलूच गटांनी या भागात चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि सैनिकांना लक्ष्य करत अनेकदा हल्ले केले आहेत. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर अब्दुल कुद्दुस बिजेंजो यांनी मंगळवारी झालेल्या हल्ल्यांची निंदा केली आहे.