नवी दिल्ली
मारूती सुझुकीच्या बलेनो कारने नुकताच एक नवा विक्रम आपल्य़ा नावावर केला आहे. कंपनीच्या बलेनो कारने 59 महिन्यांच्या कालावधीत 8 लाखहून अधिक विक्रीचा टप्पा यशस्वीपणे नुकताच गाठला आहे. 2015 मध्ये भारतीय बाजारात दाखल झालेल्या बलेनोचे हे यश नक्कीच कौतुकास्पद म्हणायला हवे. 5 वर्षाच्या अवधीतच वरील विक्रीचा आकडा गाठणे कंपनीसाठी अभिमानास्पद नक्कीच आहे. बलेनोचे हे यश ग्राहकांच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. बलेनोची निर्यात ऑस्ट्रेलिया, युरोप, लॅटीन अमेरिका, आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशिया येथेही केली जाते.