कोंडुसकोपजवळील प्रकार : इतर वाहनांचा खोळंबा
प्रतिनिधी /बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोंडुसकोपजवळ बसचालक आणि प्रवाशांमध्ये झालेल्या वादावादीमुळे काहीकाळ वाहतूक केंडी झाली. या वादावादीचा इतर वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण झाला.
परिवहन मंडळाची हुबळीला जाणारी बस कोंडुसकोपनजीक येताच बसचालक, वाहक आणि प्रवाशांमध्ये वादावादी सुरू झाली. बस थांबवून बसचालक बाहेर आल्यानंतर प्रवासी आणि बसचालकांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. दरम्यान, महामार्गावर काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी वाहतूक कोंडी झाल्याने इतर वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागला. हा प्रकार महामार्गावरच घडल्याने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या. बसचालक, वाहक आणि प्रवाशांच्या वादामुळे इतर वाहनधारकांचा खोळंबा झाला.
बसचालक, वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये बसथांब्यावर बस थांबविणे, सुटे पैसे व इतर कारणांवरून सातत्याने वादावादीचे प्रसंग घडत असतात. त्यामुळे परिवहनने यात लक्ष घालून बसचालक व वाहकांना समज द्यावी, अशी मागणीही प्रवाशांतून होत आहे.