तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग
वैराग येथुन दोन किलोमीटर अंतरावर एस.टी.बसचा ब्रेक फेल झाल्याने बस, छोटा हत्ती टमटम व क्रेन यांचा तिहेरी अपघात झाला. यामध्ये पाच गंभीर तर दहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना सालापुर, बार्शी व वैराग येथील वैद्यकीय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
रविवार २९ रोजी दुपारी दोन बार्शी आगाराची सोलापुर बार्शी या विना वाहक विना थांबा एस. टी. बसचा वैरागपासुन दोन किलोमीटर अंतरावर बंडेवार विहिरी जवळ आल्यावर ब्रेक फेल झाल्याने पुढे चालत असलेल्या छोटा हत्ती या टमटमला ओव्हरटेक करताना समोरून वाहन आले असता ब्रेक मारला पण तो न लागल्याने पुढील टमटमवर बस जावुन जोरात आदळली व अपघातग्रस्त टमटम त्याच्या पुढे चालणाऱ्या क्रेनवर जावुन आदळले.
यामध्ये टमट चालक जखमी झाला. तर एस टी बस नियंत्रणात आणण्यासाठी बस चालकाने रस्त्याच्याकडेच्या झाडाझुडपात गाडी घालुन बाभळीच्या झाडावर आदळली यामध्ये बस चालकासह दहापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत.