प्रतिनिधी/ खंडाळा
सातारा- पुणे महामार्गावरील खांबाटकी बोगद्याच्या पुढे उतारावर लक्झरी बसचा ब्रेक फेल झाल्याने पाच वाहने एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात टाटा स्ट्रोम व महिंद्रा मॅक्स जीपचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान या अपघातामुळे तब्बल एक तास वाहतूक ठप्प झाली होती तर यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
रविवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास पुणे बाजुकडे जाणारी लक्झरी बस क्र. MH- 09 – CV – 9207 ही खांबाटकी बोगदा ओलांडून पुढे आल्यावर उतारावर ब्रेक फेल झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती बस पुढे चाललेल्या टाटा स्ट्रॉम, महिंद्रा मॅक्स जीप, बजाज मोटार सायकल आणि लक्झरी बसवर आदळली. यामध्ये टाटा स्ट्रोम व महिंद्रा मॅक्सचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. या अपघातात बस रस्त्यातच आडवी झाली. तर एक तास वाहतुक ठप्प झाली होती. खंडाळा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजुला करण्यात आली. खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, वाहतुक पोलीस विठ्ठल पवार, शरद यादव, अहेरराव, पी. एस. फरांदे, ए. एम. जाधव, एस. डी. जाधव, एस. ए. मोरे, विजय पिसाळ यांनी वाहतुक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले