बेंगळूर : बेंगळूरमध्ये मोबाईल चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्याचे पोलिसांसमोरील आव्हान कायम असून शुक्रवारी मोबाईल चोरटय़ाला अटक करून त्याच्याजवळीत तब्बल 101 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मुबारक असे त्याचे नाव आहे. बेंगळूर शहर परिवहनच्या बसेसमध्ये विंडो सीटवर बसून फोनवर बोलणाऱया प्रवाशांना टार्गेट करून मोबाईल लांबवण्यात येत होते. अशोकनगर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक देवराजू यांना गस्तीवेळी मुबारक हाती सापडला. त्याच्यासमवेत असणारे दोघे फरार होण्यात यशस्वी झाले. मुबारकला अटक करून पोलीस स्थानकात आणले असता त्याच्या मोबाईल चोरी प्रकरणांचा उलगडा झाला. त्याच्याजवळील 5 लाख रुपये किमतीचे 101 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत असून फरार असलेल्या दोघांचा शोध जारी आहे.
Previous Articleदुसऱया टप्प्यातील निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
Next Article 18 हजार कोटी देऊन मोदींनी दाखविली शेतकऱयांविषयी तळमळ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.