जुन्या बसचा वापर करून मोबाईल आयसीयू सुविधा : 7 लाख 88 हजार रुपये खर्च, खेडोपाडय़ात सेवा मिळणार
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीचा फैलाव थोपविण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. याबरोबरच नवनवीन प्रयोगही केले जात आहेत. जुन्या बसचा वापर करून मोबाईल आयसीयु सुविधा तयार करण्यात आली आहे. या बसला शुक्रवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी चालना दिली.
आढावा बैठकीला जाण्याआधी मुख्यमंत्र्यांनी आयसीयु सुविधा असलेली बस व बसमध्ये तयार करण्यात आलेल्या महिलांसाठीच्या शौचालयाची पाहणी केली. यावेळी गृहमंत्री बसवराज बोम्मई, उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती, आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर आदी उपस्थित होते.
जुन्या बसचा वापर करून चार आयसीयु बेड तयार करण्यात आले आहेत. इस्पितळातील आयसीयुमध्ये असणारी सर्व सुविधा या बसमध्ये आहे. जर आमदार आणि खासदार निधीतून अशा बस खरेदी करण्यासाठी मागणी आली तर परिवहन मंडळ कमीतकमी खर्चात जुन्या बसचा वापर करून मोबाईल आयसीयु तयार करून देणार आहे.
सभा, समारंभ, जत्रा आदी ठिकाणी महिलांसाठी बसमध्ये शौचालय सुरू करण्यात आले आहे. या शौचालयाचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांनी सांगितले की, 7 लाख 88 हजार रुपये खर्च करून मोबाईल आयसीयु तयार करण्यात आली आहे. खेडोपाडय़ात या आयसीयुची सेवा मिळणार आहे, असे सांगितले. या आयसीयु सुविधा असलेल्या बसची निर्मिती हुबळी येथील परिवहन मंडळाच्या वर्कशॉपमध्ये करण्यात आली आहे. एका बसमध्ये चार आयसीयु बेड आहेत. प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सुविधा असणार आहे. खिडक्मयांना कर्टन लावण्यात आले आहेत. पंख्याची सोय आहे. औषधे ठेवण्यासाठी स्टॅण्ड आहेत. डॉक्टर, नर्ससाठीही बसमध्ये व्यवस्था आहे.