वार्ताहर /सांबरा
बसरीकट्टी येथे सोमवार दि. 11 पासून बसवेश्वर यात्रेला हर हर महादेवच्या गजरात प्रारंभ झाला. सोमवार दि. 11 रोजी आंबिल गाडे परंपरेनुसार मास्तमर्डी येथील बसवेश्वर मंदिराला गेले. तेथून परत रात्री गावामध्ये सवाद्य आंबिल गाडय़ांची मिरवणूक काढण्यात आली.
मंगळवार दि. 12 रोजी यात्रेनिमित्त रात्री 9 वाजता ऑर्केस्ट्रा व मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी यात्रा मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे.